मुंबई- मुंबईमध्ये ऑटोरिक्षा साठी २ रुपये आणि टॅक्सी साठी ३ रुपये भाडेवाढ आता प्रत्यक्ष लागू करण्यात आली आहे.कारण मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने या भाडेदरवाढीस मान्यता दिली आहे.दरम्यान,या भाडेवाढीनंतर ऑटोरिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांनी आपल्या वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेअरमीटर या महिन्यात ३० नोव्हेंबरपर्यंत रिकॅलीब्रेट करून घ्यावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय,मुंबई पूर्व यांनी केले आहे.
या नवीन भाडेवाढीनुसार, ऑटोरिक्षासाठीआता पहिल्या १.५ किलोमीटरसाठी आधीच्या २१ रुपयेऐवजी २३ रुपये आणि टॅक्सीसाठी प्रत्येक किलोमीटरसाठी आधीच्या १४.२० रुपये ऐवजी १५.३३ रुपये ठरविण्यात आले आहेत.त्यामुळे टॅक्सीला आता कमीतकमी २५ रुपयाऐवजी २७ रुपये प्रवासी ग्राहकाला द्यावे लागणार आहे.तसेच वातानुकीत टॅक्सीसाठी पूर्वीच्या ३३ रुपयेऐवजी आता ४० रुपये दर ठरविण्यात आला आहे.प्रत्येक किलोमीटरचा या टॅक्सीचा दर प्रति किलोमीटर २२.२६ ऐवजी २६.७१ रुपये असा असणार आहे.वास्तविक ही भाडेवाढ १ ऑक्टोंबरपासून अंमलात आळी आहे.त्याला नुकत्याच झालेल्या मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना योग्यप्रकारे भाडेआकारणी केली जावी यासाठी या दोन्ही वाहनांमध्ये नवीन भाडेदराप्रमाणे दुरुस्ती करून संबंधीत कार्यालयामार्फत रिकॅलीब्रेशन तपासून घेणे गरजेचे आहे.तसेच सकाळी ६ ते १० यावेळेत त्यासाठी विक्रोळीतील गोदरेज कंपनी जवळ पूर्व नियोजित वेळ घेऊन अशा वाहनाची चाचणी केली जात आहे.