संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

मुंबईत नोकदार महिलांसाठी
पालिकेची ७ ठिकाणी वसतिगृहे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: – मुंबईतील नोकरदार महिलांसाठी सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मुंबईच्या गोरेगाव येथील पहाडी भागात नोकरदार महिलांसाठी पहिले वसतिगृह बांधण्याचे काम सुरू आहे. २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी २८. ४१ कोटी रुपयांच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली होती. या ठिकाणी १६ मजल्यांची इमारत बांधण्यात येणार असून ५,८८२.६८ चौ. मी. इतके बांधकामाचे क्षेत्रफळ आहे. विकास आराखड्यात त्याकरीता आरक्षण ठेवण्यात आले आहे.
याच धर्तीवर मुंबईत सात ठिकाणी सात वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. ज्या विभागात महिला कार्यरत आहेत, त्याच विभागात त्यांची राहण्याची सोय होणे शक्य होणार आहे. यामुळे मुंबईत घर नसणाऱ्या नोकरदार महिलांच्या निवासाचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकणार आहे. तसेच बाहेरच्या शहरातून येणाऱ्या महिलांना देखील या वस्तीगृहाचा चांगला फायदा होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या