मुंबई – हिवाळ्यामध्ये अंडी खाल्ली पाहिजे असे डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ सांगतात.खरे तर संडे असो वा मंडे रोज अंडी खाल्ली पाहिजे.मात्र ऐन थंडीमध्ये अंड्याचा भाव वधारला आहे.थंडीमध्ये अंडी खाण्याचे प्रमाण वाढते कारण अंडी ही उष्ण असतात. कडाक्याच्या थंडीत अंडी खाल्ल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.पण ऐन थंडीत अंडी महागली आहे.मुंबईत प्रति डझन अंड्यांच्या दरात ६ रूपये वाढ झाली आहे.
हिवाळ्यात सकस आहार म्हणून अंड्यांना पसंती मिळते.त्यामुळे दर हिवाळ्यात अंड्यांचा खप वाढतो.यावर्षी अंड्यांची मागणी पाचपट वाढली आहे.तर दुसरीकडे बाजारातील तज्ज्ञानुसार, भारतीय अंडे सर्वात महागडे उत्पादन ठरले आहे.इंग्लंड j आणि मलेशियातून अंडे उत्पादन कमी होत असल्याने भारतीय अंड्यांना प्रचंड मागणी आली आहे. सध्या मुंबईत अंडे एका नगामागे ७ रुपये तर देशी गावठी अंडे १० ते १२ रुपयांना विकले जात आहे.