ठाणे- जगात आणि देशात मुंबईचे नाव खूप मोठे असून या शहरात दावोसच्या धर्तीवर जागतिकस्तरावरील परिषद घेण्याचा आमचा मानस आहे. पुढच्या वर्षीपासून या परिषदेला आम्ही सुरुवात करणार आहे. यामुळे दावोसला जसे उद्योगांचे करार करण्यासाठी जातात, तसे मुंबईतही करार करण्यासाठी लोक येतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. उद्योजकांना भेटणारे मंत्री मिळावेत म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, असे सांगत त्यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. उद्योग जगताला बदनाम करुन मतांसाठी वारंवार राजकारण केले जात असेल तर ते नवीन उद्योगांसाठी घातक असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
माझ्या तीन जीवनावश्यक जिममध्ये व्यायाम करताना निधन झालेल्या सिद्धांत वीर सूर्यवंशीची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल ठाणे येथील टीप टॉप प्लाझा सभागृहामध्ये लक्षवेध संस्थेच्यावतीने बिझनेस जत्रा 2022 चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कोमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोसिआचे सचिव निनाद जयवंत यांच्यासह उद्योग मोठ्या संख्येने होते. या बिझनेस जत्रा 2022 च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कोमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. दावोस परिषदेच्या पार्श्वभूमीवर आम्ही दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याचे ठरविले आहे. कारण आम्हाला शाश्वत विकास करायचा असून केवळ प्रसिद्धीसाठी काम करायचे नाही. असे काम केले तर कधी ना कधी आम्ही उघडे पडू असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उदयोग मंत्री अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. परंतु या पदाचा उन्माद किंवा माज असता कामा नये.