संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

मुंबईत गोवरची साथ 617 संशयित रुग्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मुंबईत डोळ्यांच्या साथीनंतर आता गोवरची साथ थैमान घालत आहे. गेल्या काही दिवसांत गोवरचे अनेक रुग्ण आढळले आहेत. हा आजार विशेषत: लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. तर मुंबईत एकूण 617 संशयित रुग्ण आढळल्याची महिती समोर येत आहे. मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे 2 डोस दिले जातात. गोवर आजाराचा उद्रेक थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गोवरप्रतिबंधक मोहीम सुरू केली आहे.

लहान मुलांमध्ये गोवर आजार प्रामुख्याने दिसुन येतो. तरी शहरात गोवरच्या रुग्णाची संख्या कमालीची वाढताना दिसत आहे. दरम्यान शरीरावर पुरळ येणे, अंगात ताप भरणे आणि डोळ्यांतून पाणी वाहणे अशी विविध लक्षणे दिसून येत आहेत.विशेष म्हणजे गोवर या आजारावर कुठलाही उपचार नसुन आवश्यक ती काळजी घेणे हाच त्यावरचा एक रामबाण उपाय आहे. म्हणून गोवरच्या लक्षणांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. गोवर टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण करणे. आपल्या पाल्याला संक्रमण झाले असल्यास त्याला इतरांच्या संपर्कात जाण्यास टाळावे. दरम्यान रुग्णाने भरपूर पाणी, ज्यूस यांप्रकारचे द्रव पदार्थ प्यावे. मुलाचे शरीर ओल्या कापसाने स्वच्छ करा. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपल्या पाल्याचा औषधी उपचार करावा.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami