संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मुंबईत गणेश विसर्जनाच्या दिवशी अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – केवळ आपत्कालीन सेवा पुरवणारी वाहने वगळता मुंबईत ४ ते ९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या गौरी- गणपती विसर्जनांच्या दिवशी अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.विसर्जनाच्या दिवशी होणारी गणेश भक्तांची गर्दी लक्षात ही बंदी घालण्यात आली आहे.

यंदा उद्या रविवार ४ सप्टेंबरला पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन ,५ सप्टेंबरला गौरी- गणपती विसर्जन, ६ सप्टेंबरला सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन आणि ९ सप्टेंबरला१ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि ९ सप्टेंबर या अनंत चतुर्दशी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहनाच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे.या बंदी काळात भाजीपाला,दुध,ब्रेड ,बेकरी उत्पादनाची वाहतूक करणारी वाहने,पाण्याचे टँकर ,रुग्णवाहिका,सार्वजनिक बसेस आणि सरकारी- निमसरकारी वाहने या नियमातून वगळण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami