संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मुंबईत उडत्या कंदीलावर १४ नोव्हेंबरपर्यंत बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे.त्यामुळे आता बाजारात वेगवेगळ्या कंदीलाच्या खरेदी-विक्रीला सुरुवात झाली आहे.दरवर्षी आकाशात उडणारे कंदील म्हणजेच चायनीज फ्लाइंग कंदील मोठ्या प्रमाणात सोडले जातात. मात्र, यंदा या कंदीलांवर मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत कंदील उडवण्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.
मुंबईचे डीसीपी संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. आकाशात कंदील उडवल्याने मानवी जीवन आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत चायनीज फ्लाइंग कंदिलांच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर देखील 14 नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे.येत्या 16 ऑक्टोबरपासून मुंबईत उडत्या कंदिलांचा वापर आणि विक्री 30 दिवसांसाठी प्रतिबंधित असणार आहे. या आदेशाचे पालन न केल्यास मुंबई पोलीस त्याच्यावर भादंवि कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami