संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

मुंबईतील हिंदू स्मशानभूमीत आता लाकडांऐवजी ‘जैविक विटा ” वापरणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*पालिका मोफत पुरवठा करणार

मुंबई- मुंबईतील पालिकेच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये आता मृतदेह दहनासाठी लाकडांऐवजी शेती व वृक्षकचऱ्यापासून तयार केलेल्या ब्रिकेटस बायोमास म्हणजेच जैविक विटा वापरण्यात येणार आहेत. या जैविक विटांसाठी पालिकेने मे.लाहंस ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २६ डिसेंबर २०२२ पर्यंत १ कोटी ४६ लाख १७ हजार ९७७ रुपयांचे कंत्राट दिले आहे.मृतांच्या नातेवाईकांना या जैविक विटांचा पुरवठा मोफत करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंदर्भातील प्रस्तावात म्हटले आहे की,संबंधित कंत्राटदाराला ठरलेल्या दरानुसार पैसे दिले जाणार असले तरी प्रति मृतदेह दहनासाठी २५० किलो अशा प्रकारे एक महिन्याच्या सुक्या जैविक विटांचा पुरवठा केल्यानंतर कंत्राटदाराने स्मशानभूमीनिहाय मासिक बिल सादर करणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे हा पुरवठा करताना अटी-शर्थीचे पालन करावे लागणार आहे. स्मशानभूमीपर्यत स्वखर्चाने पुरवठा करावा लागणार आहे.
वास्तविक बहुतांशी स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी व गॅस दाहिनी उभारण्यात आल्या आहेत. मात्र तरीही आजही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दहन करण्याची मागणी असते.अशा ठिकाणी पालिकेतर्फे लाकडाचा मोफत पुरवठा केला जातो. पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड पालिकेतर्फे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते.जैविक विटांचा पुरवठा करण्यात येणाऱ्या १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारण ६२०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात.वर्षभरात तेथे मृतदेहाच्या दहनासाठी साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो लाकडांचा वापर करण्यात येतो. शेती कचऱ्यांतील ‘एक तृतीयांश’ भाग फेकून देण्यात येतो. त्यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार करण्यात येतात.ज्यामुळे या कचऱ्याचा अधिक चांगला उपयोग करण्याबरोबरच पर्यावरणपुरकता देखील जपली जाते.लाकडांपेक्षा ‘ब्रिकेट्स बायोमास’मुळे प्राप्त होणारी ‘ज्वलन उष्णता’ अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे असते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami