संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मुंबईतील सर्व टपाल कार्यालये सायंकाळी ८ वाजेपर्यंत खुली राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईकर चाकरमान्यांना आपली नोकरी सांभाळत असताना वेळेअभावी पोस्टाची कामे राहून जातात.तसेच टपाल कार्यालय लवकर बंद होत असल्याने कामे रखडतात. यावर तोडगा काढत आता मुंबई विभागाने शहर उपनगरातील टपाल कार्यालये सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता ऑफिसमधून घरी आल्यावर टपाल कार्यालयातून जाऊन काम करणे नोकरदार मुंबईकरांसाठी सोयीचे ठरणार आहे.

मुंबईतील सुमारे ६० टपाल कार्यालये सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत असणार आहेत,याची घोषणा ९ ऑक्टोबरच्या जागतिक टपाल दिनानिमित्त करण्यात येणार आहे.याकरिता, मुंबईच्या टपाल विभागाने शहर उपनगरातील टपाल कार्यालयांचा आढावा घेतला.त्यानंतर अधिकाधिक रहिवासी क्षेत्रातील टपाल कार्यालयांची निवड करण्यात आली.मुंबईच्या सहा परिमंडळांतील एकूण साठ टपाल कार्यालयांचा यात समावेश आहे.दिवसभर सेवा देणाऱ्या टपाल कार्यालयांत मुंबई पूर्व क्षेत्रातील दहा,पश्चिम क्षेत्रातील दहा,दक्षिण मुंबईतील तीन, उत्तर मुंबईतील दहा,उत्तर पूर्व क्षेत्रातील बारा आणि उत्तर पश्चिम क्षेत्रातील दहा कार्यालयांचा समावेश आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami