संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 29 January 2023

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक
मंदिर आजपासून पाच दिवस बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मूर्तीला सिंदूर लेपन करणार

मुंबई – मुंबईकर भाविकांचे श्रद्धास्थान आणि आराध्यदैवत असलेले दादरच्या प्रभादेवी येथील गणपती बाप्पाचे सिद्धिविनायक मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.दररोज या मंदिरात आपली सुखदुःखे बाप्पाला सांगण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्याचे गव्हाणे घालण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मुंबईकरांसह लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेले हे प सिद्धिविनायक मंदिर आता उद्या बुधवारपासून पुढील पाच दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सिध्दिविनायक मंदिरातील प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तीचे दर्शन भाविकांना तब्बल ५ दिवस घेता येणार नाही. बुधवार १४ डिसेंबर ते रविवार १८ डिसेंबर या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाना दर्शनासाठी बंद राहणार आहे. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्यामुळे हे मंदिर बंद असणार आहे.प्रत्यक्ष मूर्ती ऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. सोमवार १९ डिसेंबरला गणेश मूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येणार आहे,अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami