संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

मुंबईतील अपायकारक कचरा उरण,पनवेलच्या नागरी रस्त्यांवर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उरण – दररोज मुंबईतून येणारा हजारो टन घातक, अपायकारक कचर्‍याचे उरण-पनवेल तालुक्याच्या हद्दीतील सिडकोच्या जागांवर मानव निर्मित डोंगर तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे हा हानिकारक कचरा आता चक्क रहदारीच्या नागरी रस्त्यावर टाकला जात आहे.त्यामुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

हा कचरा आत्ता थेट हा कचरा गव्हाण फाटा-दिघोडे रस्त्यावरच टाकला जात असल्याने रस्ता धोकादायक बनला असून प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.नवी मुंबईचाच एक भाग म्हणून विकसित होत असलेल्या उरणमधील वाढत्या नागरीकरणामुळे तालुक्यातील कचर्‍याची समस्या गंभीर झाली आहे. इथल्या ग्रामपंचायतीना कचराभूमीची जागा नसल्याने ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा गावा शेजारील रहदारीच्या रस्त्यावर टाकण्यात येत आहे.त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांना व विभागातील रस्ते हे गावातील कचर्‍यानी भरू लागले आहेत. हा कचरा कुजू लागल्याने कचर्‍यामुळे निर्माण होणार्‍या दुर्गंधीचा त्रास या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवासी व नागरिकांना नाक मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.

हजारो टन कचरा डेब्रिज डेब्रिज हे वहाल ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनार्‍यावर खारफुटी तसेच खाडीच्या पाण्यात टाकत असल्याने खारफुटीची वने नष्ट होऊन खाडीतील विविध जातींचे मासे संपुष्टात येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रदुषणात वाढ होऊन मासेमारी करणार्‍या बांधवांचे उपजिविकेचे साधन संपुष्टात येऊ लागले आहे.या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून भूखंड तर येथील मोठ्या उद्योगांकडून निधी मिळावा अशी मागणी पंचायत समितीच्या वतीने वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केली जात आहे. त्यामुळे गावागावांतील कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे.सध्या उरणचा विकास झपाट्याने होत असतांना कचर्‍याची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून उरणमधील निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami