संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मुंबईचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमच्या शिफारशीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना काढली.
सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबरला कॉलेजियमची बैठक झाली. या बैठकीत प्रसन्ना वराळे यांच्यासह आणखी दोन न्यायमूर्तींची वेगवेगळ्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपतींनी ती मंजूर केल्यानंतर केंद्र सरकारने आधीसूचना काढली आहे. त्यानुसार वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. न्यायमूर्ती वराळे यांनी १९८५ मध्ये कायद्याची पदवी घेतली. एड्वोकेट एस. एन. लोया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली सुरू केली होती. औरंगाबादच्या आंबेडकर विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील म्हणूनही त्यांनी काम केले. १८ जुलै २००८ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायदानाचे काम करत आहेत. आता कर्नाटकचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून ते काम करणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami