संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मुंबईकरांनो आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईकरांनो आज, रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. आज मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्यावतीने देण्यात आली आहे. तसेच रविवार असल्यामुळे आज धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहे.

तर, पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील. तसेच पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami