संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

मिरकरवाडा बंदरात बुडालेल्या नौकांचे अवशेष बाहेर काढा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी : बंदरात वापरात नसलेल्या नौकांमुळे बंदरामध्ये एकाचवेळी नौका उभ्या करताना किंवा समुद्रात मासेमारीसाठी नेताना अनेकवेळा अडचण होते. त्यामुळे मिरकरवाडा बंदरात बुडालेल्या नौकांचे अवशेष आणि वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका तातडीने बाहेर काढा, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदरातील समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी मिरकरवाडा बंदराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अनेक मच्छिमार बांधवही उपस्थित होते. मिरकरवाडा बंदराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता आहे. याबाबत सातत्याने मच्छिमारांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात होते. याबाबत मंत्री सामंत यांनी संवाद साधला. तसेच, बंदरामध्ये एकाचवेळी नौका उभ्या करताना किंवा समुद्रात मासेमारीसाठी नेताना अनेकवेळा अडचण होते. काहीवेळा नौका बाहेर काढण्यासाठी थांबून राहावे लागते. हे टाळण्यासाठी विना वापर नौका किंवा त्यांचे अवशेष काढून टाकणे गरजेचे असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. यासाठी मत्स्य विभागाकडून पावले उचलणे आवश्यक आहे, अशी माहिती मच्छिमारांनी यावेळी दिली.या बंद नौका काढून टाकण्यासासाठी कार्यवाही करा, अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami