संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

मिठी नदीवर पुन्हा निधी ओतणार गटारांसाठी पालिका बोगदा बांधणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – २६ जुलै २००५ रोजीच्या प्रलयकारी पावसात रौद्र रूप धारण करून मिठी नदीने मुंबईकरांच्या उरात धडकी भरवली होती. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी ही मिठी नदी पुनरुज्जीवित केली जाणार आहे असेसांगत पुन्हा नदीवर निधी ओतला जाणार आहे .

मिठीसाठी महापालिकेने कुर्ला ते धारावी असा ६.५ किमीचा भूमिगत बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ६०४ कोटी खर्च होणार आहेत. नाल्यातील पाणी या बोगद्यातून धारावी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले जाणार आहे. नदीतील गाळ काढून तिची साफसफाई केली जाणार आहे. त्यामुळे तिला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.
मिठी नदी पुनरुज्जीवीत करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. त्यात नदीतील गाळ काढून तिची साफसफाई केली जाणार आहे. कुर्ल्याच्या दोन नाल्यांमधील गटारांचे सांडपाणी भुयारी बोगद्यातून धारावी केंद्रात नेले जाणार आहे. त्यासाठी ६.५ किमीचा बोगदा बांधला जाणार आहे. त्यासाठी ६०४ कोटी खर्च येणार आहे. सफेद फूल नाला आणि बापट नाल्यातील पाणी थेट मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे ती दूषित होत आहे. म्हणून पालिकेने या नाल्यातील पाणी भुयारी बोगद्यातून धारावी सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रात नेण्याची योजना आखली आहे. त्यासाठी कुर्ला ते धारावी बोगदा बांधला जाणार आहे. पालिकेच्या स्थायी समितीने १४ महिन्यांपूर्वी त्याला मंजुरी दिली होती. त्याच्या कामाच्या निविदा पालिकेने मागवल्या आहेत. मिठीच्या स्वच्छतेबरोबरच तिचे सुशोभीकरण, संरक्षित भिंत आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. नदीच्या स्वच्छतेसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र जागोजागी तयार केली जाणार आहेत. भूमिकत बोगदा त्याचाच एक भाग आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami