हनहथियाल – मिझोरामच्या हनहथियाल जिल्ह्यातील मौद्रह गावात दगडी खाण अपघातस्थळावरून आतापर्यंत 11 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.एक कामगार अद्याप बेपत्ता असून आज तीन कामगारांचे मृतदेह मिळाल्याची माहिती हनहथियालचे अतिरिक्त उपायुक्त साजिकपुई यांनी आज दिली.
सोमवारी दुपारी 3 वाजता हनहथियाल जिल्ह्यातील खाणीत अचानक दगडी कोसळून कामगार दबले गेले होते. त्यानंतर सुरवातीला तेथील स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरु केले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु झाले.मिझोराम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 8 मजुरांपैकी 4 मजूर पश्चिम बंगालचे आहेत. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 वर्षीय मदन दास, 21 वर्षीय राकेश विश्वास, 22 वर्षीय मिंटू मंडल आणि 25 वर्षीय बुद्धदेव मंडल अशी मृतांची नावे आहेत. याआधी उपायुक्त आर लालरेमसांगा यांनी सांगितलं की, खाण कोसळण्याच्या घटनेत 12 जण बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत त्यापैकी आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी शोधमोहीम सुरू असून मंगळवारी सकाळी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे एक पथक तिथे पोहोचले. यात दोन अधिकारी आणि 13 जवानांचा समावेश आहे.