संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 26 September 2022

माहीम किल्ल्यातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई :मुंबईतील माहीमच्या ऐतिहासिक किल्ल्यात गेले कित्येक वर्षे शेकडो झोपडीधारक राहतात. मात्र आता किल्ल्याचे सुशोभीकरण केले जाणार असून हा किल्ला देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे लवकरच माहीम किल्ल्यातील २२२ झोपडीधारक नवीन घरात जाणार आहेत. याचाच अर्थ राज्य सरकारने त्यांचे लवकरच पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माहीम किल्ल्याचे संवर्धन होणार आहे. त्यामुळे या किल्ल्यावरील झोपडीधारकांचे काय? तर लवकरच राज्य सरकारने त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. १९७०-७२ पासून या किल्ल्यावर शेकडो झोपडीधारक राहत आहेत. त्यांच्या भविष्याचा विचार करता, गडावरील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे आदेश पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच गडावरील वास्तूंची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. माहीम किल्ल्यावरील झोपड्या झोपडपट्टीधारकांनी रिकाम्या केल्यानंतर किल्ल्यावरील झोपड्या पाडण्यास सुरुवात केल्यानांतरच माहीम किल्ल्याच्या जीर्णोद्धाराची योजना व प्रस्ताव महापालिकेच्या वतीने पुरातत्त्व सल्लागार नेमून केले जातील.

या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, किल्ल्यावर सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच पर्यटकांसाठी हा किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा यासाठी नेमके कोणत्या उपाययोजना हाती घ्यायच्या, अशा अनेक विषयांवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. या विषयांच्या अनुषंगाने मंत्रालयातील दालनात पुरातत्त्व विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माहीम किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करून किल्ल्यावरील वास्तव्यास असणाऱ्या राहिवाश्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, ३१४ किल्ल्यावर असणाऱ्या सदनिकांना नोटीस जारी करण्यात आल्या असून, त्यातील २२२ झोपड्या पात्र आहेत. दरम्यान, नोटीस जारी केल्यानंतर झोपडीधारकांनी छाननीसाठी कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांची छाननी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami