संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

‘माळेगाव’ च्या वार्षिक सभेत गोंधळसभासद मुद्यावरून आले गुद्द्यावर !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बारामती- तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने या कारखान्याच्या हद्दीतील १० गावे घेण्याचा विषय वार्षिक सभेत अभूतपूर्व गोंधळात मंजूर केला. हा विषय मंजूर होताना अक्षरशः मुद्द्यावरून गुद्यावर अनेक सभासद कार्यकर्ते आले. विरोधकांनी ही गावे घेऊ नये, हा विषय राजकीय असून मुळ सभासदांच्या अस्तित्वाला धोका पोचू शकतो. त्यासाठी गुप्त मतदान घ्या, असे थेट आव्हान विरोधी संचालक रंजन तावरे, गुलाबराव गावडे आदींनी दिले. परंतु, अनेक सभासदांनी वरील विषय मंजूर करण्यासाठी घेतलेला पुढाकार, सोमेश्वर साखर कारखाना सभासदांनी सर्वसाधारण सभेने दिलेली मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे सोमेश्वरच्या संबंधित आठशेपेक्षा अधिक वाढीव गावातील शेतकऱ्यांनी केलेली मागणी ग्राह्य धरत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी गावे जोडण्याचा विषय मंजूर केला.

यावेळी विरोधी नेते व माजी अध्यक्ष रंजन तावरे,सभासद युवराज तावरे, विलास सस्ते, रोहित कोकरे,विकास जगताप, अॅड.रोहित कोकरे,जनार्दन झांबरे आदींनी ‘सोमेश्वर’ची गावे घेण्यात ‘माळेगाव’च्या सभासदांची हजारो कोटींची मालमत्ता इतरांच्या मालकीची नको आणि राजकीय नेत्यांच्या दबावाखाली अध्यक्ष बाळासाहेब भाऊ चुकीचा निर्णय घेवू नये,अशी आग्रही मागणी केली. ‘माळेगाव’चा शिक्षण संस्थेवर प्रवेशाचा दबाव, मंगल कार्यालयातील तारखा मिळण्यासाठी मुळ सभासदांना होत असलेली हेळसांड आणि राजकीय आणि सामाजिक अस्तित्वाचा प्रश्न आदी मुद्दे चर्चेत निर्णय ठरली. सभा संपल्यानंतर ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी प्रतिसभा घेत संचालक मंडळाच्या भूमिकेचा निषेध केला.

माळेगावच्या प्रशासनाच्यावतीने कारखाना विस्तारीकरणाच्या विचार करता आगामी काळात होणारी ऊस टंचाई विचारात घेत सोमेश्वरच्या हद्दीतील १० गावे घेणे क्रमप्राप्त ठरते, असे मत मदनराव देवकाते, सुनील पवार, गुलाबराव देवकाते, अॅड. रवींद्र माने, विनायक गावडे आदी बहुतांशी सभासदांनी व्यक्त केले. संचालक सुरेश खलाटे म्हणाले, ‘‘माळेगाव कारखान्याचे १९ हजार सभासद आहेत आणि नविन येणारे हजार बाराशे सभासद आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन आपल्याला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे माळेगावने विषय मंजूर केला म्हणजे सर्वकाही झाले, असे नाही. भूमिका सर्वसमावेशक ठेवा. जात, धर्म, राजकणार अथवा वेड्या कल्पना घेऊन विरोध करू नका.आपली उसाची गरज विचारात घेऊन निर्णय घ्या.एका देशात आपण राहतो,तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami