संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

माल्ल्याने ३१८ कोटी दिले नाही! २२ सप्टेंबरला कोर्टात सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भारतीय बँकांना सुमारे ९ हजार कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्याने सुप्रीम कोर्टाचाही आदेश पाळलेला नाही. ३१८ कोटी त्याने भरले नाहीत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यावर आता सरन्यायाधीश उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर १२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

भारतीय बँकांना गंडा घालून परदेशात पळून गेलेला मद्य सम्राट विजय माल्याला न्यायालयाच्या अवमान प्रकरणी ४ महिने तुरुंगवासाची शिक्षा ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने सुनावली होती. त्याला ४० मिलियन डॉलर म्हणजे ३१८ कोटी जमा करण्याचे आदेश त्यावेळी न्यायालयाने दिले होते. त्यासाठी त्याला ४ आठवड्यांची मुदत दिली होती. परंतु माल्ल्याने या आदेशाचे पालन केले नाही. त्याने हे पैसे भरलेच नाहीत. असे सोमवारी बंगळुच्या कर्ज वसुली न्यायाधीकरणाच्या अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. या प्रकरणावर १२ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami