माले – मालदीवची राजधानी माले येथे गुरुवारी परदेशी कामगारांच्या वस्तीला लागलेल्या आगीत 9 भारतीयांसह 10 जणांचा मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
या घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कार गॅरेजमध्ये भीषण आग लागली. त्यानंतर काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर इमारतीच्या वरील मजल्यावर दहा जणांचे मृतदेह आढळून आले. ज्यात नऊ भारतीयांचा तर, एका बांग्लादेशी नागरिकाचा समावेश आहे. या घटनेनंतर मालदीव येथील भारतीय दुतावासाने माले येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच आम्ही मालदीव येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.