नाशिक- मालेगावच्या द्याने शिवारात आज पहाटे घडलेल्या अग्नीतांडवात अनेक यंत्रमाग कारखाने जळून बेचिराख झाले. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मालेगावच्या द्याने शिवारात आज पहाटे आग लागली. यंत्रमाग कारखान्याला लागलेली आग झपाट्याने पसरली. त्यात अनेक कारखाने भक्षस्थानी पडले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.