मुंबई – मविआ सरकारच्या काळात मालाड पश्चिमेकडील स्मशानभूमीच्या मागे असलेल्या महापालिका मैदानाला देण्यात आलेले टिपूसुलताचे नाव हटवण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने मविआला आणखी एक धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्वीट करत माहिती केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या अखेर आंदोलन यशस्वी आहे. गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाडमधील मैदानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन हटवले आहे.’
ज्यावेळी या मैदानाला टिपूसुलतानचे नाव देण्यात आले होते. त्यावेळी राज्यात मविआ सरकार अस्तित्वात होते. टिपूसुलतान या नावावरुन मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत हिंदुत्व सोडल्याची टीका केली होती. या नावावरून भाजपने आक्षेप घेत आंदोलन देखील केले होते. त्यामुळे हा वाद प्रचंड वाढला होता.