पुणे :- बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर जंक्शन येथे मार्निंग वॉक साठी गेलेल्या दोन तरुणींचा अपघाती मृत्यू झाला. अज्ञात वाहनांने धडक दिल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. अर्चना सनमठ व अनिता शिंदे अपघातात मृत पावलेल्या दोन तरुणींची नावे. या अपघातानंतर वालचंदगर पोलिसांनी ताताडीने अवजड वाहनाचा तपास करण्याचे काम सुरु केले. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.
आज सकाळी सातच्या सुमारास अर्चना सनमठ व अनिता शिंदे या दोघी पोलिस ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत होत्या. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात अजवड वाहनाने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता शिंदे जखमी झाल्या. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत. यात तरुणींना धडक दिलेल्या अवजड वाहनाचा तपास सुरु आहे. बारामती ते इंदापूर दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरु आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक अडथळे येत असतात.