वॉशिंग्टन – हॉलिवूडचा ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मायकल जॅक्सनचे चाहते पुन्हा एकदा त्याला मून वॉक करताना पाहू शकतील. मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर लवकरच बायोपिक येत असून यात मायकल जॅक्सनची मुख्य भूमिका त्याचा भाचा जाफर जॅक्सन साकारणार आहे.
मायकल जॅक्सनची चाल, ढाल, केस, स्टाईल आणि फॅशन सेन्स, सगळेच खास होते. त्याचे करोडो चाहते त्याची शैली कॉपी करतात. जॅक्सनच्या बायोपिकमध्ये त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य दाखवण्यात येणार आहे. जाफरचा मून वॉक करतानाचा फोटो शेअर करताना प्रोडक्शन हाऊसने याची घोषणा केली. त्याचवेळी जाफर जॅक्सनने त्याच्या इंस्टाग्रामवर देखील एक फोटो पोस्ट केला.