संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मान्सून आठवडाभर उशिरा परतणार! ३० ऑक्टोबरनंतर जोर वाढणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – मान्सूनचा परतीचा प्रवास २० सप्टेंबरला राजस्थानातून सुरू झाल्यानंतर उत्तर भारतावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही प्रगती गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाली आहे.या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवसांत राजस्थान, हरयाणा, चंडीगड, दिल्ली आणि पंजाब या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. त्यामुळे वायव्य भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास आणखी पाच ते सहा दिवसांनी उशिराने होऊ शकतो, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागचे प्रमुख डॉ.अनुप काश्यपी यांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या काही भागांत ३० सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळेही राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा होईल. हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजात हे नमूद करण्यात आले आहे.विदर्भ आणि कोकण- गोवा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर कमी होईल. उत्तर- मध्य कोकणात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा काहीसा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात साधारण पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.तर ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात आठवड्यात बंगालच्या उपसागरावर एक प्रणाली तयार होऊ शकते आणि अरबी समुद्रातून पश्चि मेकडील वायांचा जोर वाढू शकतो.त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र, संपूर्ण विदर्भ आणि दक्षिण कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, तर पुण्यासह उर्वरित राज्यात त्या कालावधीत सामान्य पाऊस पडू शकतो, असेही डॉ. अनुप काश्यपी म्हणाले

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami