संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मानवाला घेऊन उड्डाण करणारे ड्रोन तयार! लवकरच नौदलात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : माणसाला घेऊन उड्डाण करणारे देशातील पहिले ड्रोन तयार करण्यात आले आहे. ‘ त्याचे नाव ‘वरुण’ असे ठेवण्यात आले आहे. हे स्वदेशी ‘वरुण’ ड्रोन’ पुणे येथील सागर डिफेन्स’ या स्टार्टअपने बनवले असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.तब्बल १०० किलो वजन घेऊन २५-३० किलोमीटरपर्यंत अर्धा तास हे द्रोण उड्डाण करू शकणार आहे.

भारताने प्रथमच मानवांना घेऊन जाणारे वरुण ड्रोन पूर्णपणे तयार केले आहे. स्वदेशी बनावटीचे पायलटलेस ड्रोन लवकरच भारतीय नौदलात सामील होणार आहे. याची कसून चाचणी केल्यानंतर भारतीय नौदल पहिल्यांदाच युद्धनौकांवर याचा वापर करणार आहे. यानंतर त्याचा उपयोग मानवांच्या वाहतुकीसाठी केला जाईल. नुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या ‘स्वावलंबन’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्या व्यक्तीला फक्त त्यात बसायचे असते आणि त्याशिवाय त्याला काही करायचे नसते. हे ड्रोन त्याला स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जानारे असेल. ते रिमोटच्या साहाय्याने चालवले जाणार आहे. यात चार ऑटो पायलट मोड आहेत, काही रोटर निकामी झाल्यासही सतत उड्डाण करण्याची क्षमता टिकवून ठेवतात.तसेच पॅराशूटच्या माध्यमातून सुरक्षित लँडिंग करणे शक्य असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या वरुण ड्रोनच्या जमिनीवर आधारित चाचण्या सुरू असून ‘वरुण’च्या सागरी चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. जे नौदलाच्या अनेक गरजा पूर्ण करेल. सध्या नौदलाला समुद्रात एका जहाजातून दुसऱ्या जहाजात माल पाठवायचा असेल तर दोन्ही जहाजे एकमेकांच्या जवळ आणून मगच मालाची वाहतूक केली जाते. मात्र ‘वरुण’च्या मदतीने हे काम सहज पार पडेल अशी माहतीही समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami