संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

मानधनवाढीसाठी स्वातंत्र्य सैनिकांचेआझाद मैदानात धरणे आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मानधनात वाढ करावी, पाल्यांना सरकारी निर्णयानुसार नियुक्ती द्यावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री भेट देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बलभीम पाटील यांनी दिला.
स्वातंत्र्यसैनिकांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्यांची पूर्तता न केल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यामुळे १२ सप्टेंबरपासून स्वातंत्र्य सैनिकांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री आम्हाला भेटून मागण्यांबाबत चर्चा करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. मानधनात वाढ करावी, पाल्यांना नियुक्ती द्यावी, नामनिर्देशनाबाबतचा निर्णय रद्द करावा, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना १० टक्के आरक्षण मिळावे आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami