संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

माधुरी दीक्षितने मुंबईत ४८ कोटींचे घर खरेदी केले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईच्या लोअर परळमध्ये ४८ कोटींचे नवीन अलिशान घर खरेदी केले आहे. इंडियाबुल्स ब्लू प्रोजेक्टच्या ५३ व्या मजल्यावर हे घर आहे. घरासोबत ७ कार पार्किंग आहेत. झॅपकीच्या रिपोर्टनुसार माधुरीने लोअर परेल भागात नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत ४८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. इंडियाबुल्स ब्लू प्रोजेक्टमध्ये हे घर आहे. २८ सप्टेंबरला त्याची नोंदणी झाली. ५३ व्या मजल्यावरील ५,३८४ चौरस फुटांच्या या घराला ७ कार पार्किंग आहेत. कॅलिस लँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून तिने हे घर खरेदी केले आहे. माधुरीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत भाड्याने घेतले आहे. त्यासाठी ती दरमहा १२.५ लाख रुपये भाडे देते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami