संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

माथेरानच्या टॉय ट्रेनचा एसी डबा
सर्वसामान्यांचे खिसे रिकामे करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – नेरळ ते माथेरानचा टॉय ट्रेनचा प्रवास आता थंडगार होणार आहे. पर्यटकांसाठी सुरु केलेल्या टॉय ट्रेनला लवकरच एक खास वातानुकूलित डबा जोडण्यात येणार आहे. हा डबा आठ आसनी असणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे पर्यटकांना आरामदायी प्रवास करत माथेरानचे निसर्ग सौंदर्य न्याहाळता येणार आहे. पर्यटकांच्या मागणीमुळे हा वातानुकूलित डबा जोडला जाणार आहे. या डब्यातून एकाच दिवशी जाऊन- येऊन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना ३२ हजार ८८ रुपये शुल्क मोजावे लागणार तर, विकेंडला ४४ हजार ६०८ रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत.
टॉय ट्रेनच्या या डब्याचे बुकींग प्रवाश्यांना सात दिवस अशीच करावे लागणार आहे. त्याचबरोबर प्रवासापूर्वी ४८ तासात पैसे भरावे लागणार आहेत. ही टॉय ट्रेन पहिल्या फेरीत नेरूळहून सकाळी ८:५० ला सुटणार असून ११:३० वाजता माथेरानला पोहोचणार आहे. तर दुसऱ्या फेरीत सकाळी १०:२५ ते १:०५ या वेळेत नेरुळ ते माथेरान धावणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाला पहिली फेरी दुपारी २:४५ ते ४:३० आणि दुसरी फेरी सायंकाळी ४ ते ६:४० या वेळेत माथेरान ते नेरुळ अशी असेल. मात्र, प्रवासशुल्क खूपच जास्त असल्याने सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होणार असल्याची टीका केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या