संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

माणसाच्या फुप्फुसात जावून
मायक्रोरोबोट उपचार करणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन- कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी आता रोबोटद्वारे तेही रुग्णाच्या शरीरात जावून उपचार करण्याबाबत संशोधन केले आहे. न्यूमोनियाच्या आजारात फुप्फुसांमध्ये जाऊन उपचार करू शकणारे मायक्रोरोबोट या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहेत.त्यामुळे या आजारावर अतिशय प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे.यासंदर्भात केलेल्या प्रयोगात उंदरांच्या फुप्फुसात जाऊन मायक्रोरोबोटने दिलेल्या औषधामुळे न्यूमोनियाच्या विषाणूंचा नाश झाला.मात्र ज्यांच्यावर असे उपचार केले नाही,ते उंदीर तीन दिवसांत मरण पावले.
मायक्रोरोबोट हे फुप्फुसातील संसर्गाशी लढण्यात अधिक सक्षम असतात.तसेच ते न्यूमोनियामुळे फुप्फुसाला आलेली सूज कमी करतात. स्यूडोमोनास एरुनिगोसा या विषाणूमुळे उंदरांना होणाऱ्या न्युमोनियावर उपचार यशस्वी होतात. मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर असणाऱ्या रुग्णांना या विषाणूंमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये विंडपाईपद्वारे टाकल्या गेलेल्या ट्युबमधून त्यांच्या फुप्फुसात मायक्रोरोबोट पाठविला.त्यानंतर सुमारे एक आठवड्याच्या उपचारांनंतर उंदीर पूर्णपणे बरे झाले.अँटीबायोटिक औषधे इंजेक्शनद्वारे देण्यापेक्षा रोबोटद्वारे दिलेले औषध अधिक परिणामकारक असल्याचे लक्षात आले.मायक्रोरोबोट विशिष्ट प्रकारच्या पेशींच्या घटकांपासून बनविण्यात आले असून त्यांच्या पृष्ठभागावर विषाणूविरोधी औषधांचा अंश ठेवण्यात येतो. फुप्फुसात शिरकाव केल्यानंतर हे मायक्रोरोबोट आपल्याकडील औषध तिथे पसरवितात.त्या औषधाच्या माऱ्याने न्यूमोनियाचे विषाणू नष्ट होतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या