संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

माजी राज्यमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- महाराष्ट्राचे माजी कामगार राज्यमंत्री व ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १ च्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. नागपूरचे महापौर ते कामगार राज्यमंत्री अशी राजकीय कारकीर्द असलेल्या हरिभाऊ नाईक यांना कामगारांविषयी विशेष आस्था आणि आपुलकी होती. त्यांच्या हक्कांसाठी ते लढत होते.
हरिभाऊ नाईक नैतिक मूल्यांसाठी ओळखले जात होते. १९७१ मध्ये नागपूरचे महापौर असताना काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्षाच्या गटातील उमेदवाराचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून नाईक यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला होता. ज्या पक्षाचे व त्याला पाठिंबा देणाऱ्या गटाचे मी नेतृत्व करतो, त्या गटातील उमेदवाराला दगाफटका होत असेल तर सत्तेत राहण्याचा मला अधिकार नाही. म्हणून मी राजीनामा देतो, असे त्यांनी म्हटले होते. कामगार चळवळीतील लढवय्या नेता म्हणूनही त्यांची ओळख होती. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे ते अध्यक्ष होते. आयएलओ जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष, अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami