मुंबई – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात काँग्रेसचे अध्यक्ष, गांधी कुटुंबीय यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिग्विजय सिंग, कमलनाथ, भूपिंदरसिंग हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसीम खान, रामकिशन ओझा यांचाही यादीत समावेश आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबरला आहे.