संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

माजी नगराध्यक्ष राहुल पंडित शिंदे गटाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी – शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीत शिंदे गटाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना हा मोठा धक्का मानला जातो. यामुळे रत्नागिरीत ठाकरे गटासमोर शिंदे गटाचे तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योग मंत्रीपद उदय सामंतांना दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे, असे जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर राहुल पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रत्नागिरीत उदय सामंत, योगेश कदम आणि रामदास कदम शिंदे गटात गेल्यामुळे सध्या रत्नागिरीत एकनाथ शिंदे गटाचे पारडे जड दिसते. त्यातच आता ऐकेकाळचे राजन साळवी यांचे कडवे समर्थक राहुल पंडित यांची शिंदे गटाने जिल्हाप्रमुखपदी निवड केल्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami