संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या निवृत्ती वेतनात वाढ; बीसीसीआयचा मोठा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंचांसाठी मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयने ट्विट करून माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या निवृत्ती वेतनात अर्थात पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. बीसीसीआयने सुमारे ९०० खेळाडू आणि पंचांच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांना पूर्वी १५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळायचे त्यांना आता ३० हजार रुपये मिळणार आहेत. तर, २२,५०० रुपये निवृत्त वेतन मिळणाऱ्या खेळाडूंना आता ४५,००० आणि ३०,००० रुपये निवृत्त वेतन असणाऱ्यांना ५२,५०० रुपये मिळतील. याशिवाय ३७,५०० रुपये मिळणाऱ्यांना ६०,००० रुपये देण्यात येतील आणि ५० हजार निवृत्ती वेतन मिळत असलेल्या खेळाडू आणि पंचांना ७० हजार रुपये दिले जातील. १ जून २०२२ पासून नवी पेन्शन योजना लागू असणार आहे.

दरम्यान, ‘आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक गरजांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. खेळाडू कायमच महत्त्वाचे असतात, निवृत्तीनंतरही त्यांची देखभाल केली गेली पाहिजे, हे बोर्डाचे कर्तव्य आहे. तसेच पंचही खेळासाठी महत्त्वाचे आहेत, बीसीसीआयला त्यांच्या योगदानाची जाणीव आहे’, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले. तर, ‘खेळाडूंचे कल्याण ही आमची प्राथमिकता आहे, मग ते सध्याचे खेळाडू असो किंवा माजी. पेन्शन वाढवणे हे त्यापैकीच एक पाऊल आहे. बीसीसीआय मागच्या काही वर्षांमध्ये पंचांनी दिलेल्या योगदानाला महत्त्व देते आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या सेवेबाबत त्यांना धन्यवाद देते’, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami