संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

माजलगावचे धरण १०० टक्के भरले! कोणत्याही क्षणी दरवाजे उघडणार ?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – जिल्ह्यात सद्यस्थितीत पाऊस कमी अधिक प्रमाणात असला तरी धरणाच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होताना दिसून येत आहे.बीडच्या माजलगावचे धरण १०० टक्के भरले आहे. तर बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात ७०.३० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील माजलगावच्य धरणात जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी सोडल्याने त्याचबरोबर जिल्ह्यातील सिंदफणा, बिंदुसरा,कुंडलिका यासह अनेक नद्या वाहू लागल्याने, त्याचे पाणी माजलगावच्या धरणाला येते.त्यामुळे माजलगाव धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. परिणामी आता धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे. धरण क्षेत्रात असणाऱ्या संगमेश्वर प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्याचबरोबर मांजरा नदीला पाणी आल्यामुळे या धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे.दरम्यान माजलगावच्या धरणामुळे माजलगावसह बीड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर मांजरा धरणात वाढत असणाऱ्या पाणीसाठ्यामुळे बीड,लातूर,उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचा देखील पाणीप्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami