संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

महिलेसह दोन मुलींची हत्या
ड्रायव्हरची गळफास घेत आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईतील कांदिवली परिसरात चार जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.एका ड्रायव्हरने प्रेम प्रकरणातून महिलेसह तिच्या दोन मुलींची हत्या करून नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृत चालकाच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा मजकूर नमूद करण्यात आला आहे.
या हत्या आणि आत्महत्या प्रकरणातील मृतांची नावे किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि आत्महत्या करणारा शिवदयाल सेन अशी आहेत. यातील ड्रायव्हर शिवदयालचे मृत तीन जणींपैकी एकीसोबत प्रेमसंबंध होते.यातून या प्रकरणाला हिंसक वळण लागल्याचे समोर येत आहे. ड्रायव्हरच्या प्रेमसंबंधांची माहिती कुटुंबातील इतर जणांना समजली. यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. या वादाला कंटाळून ड्रायव्हरने महिलेची हत्या केली. त्यानंतर त्याने दोन्ही तरुणींची हत्या करत स्वत:चे जीवन संपवले. पोलिसांनी चारही मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहेत.तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार शस्त्र जप्त केले आहे.मृत ड्रायव्हर शिवदयाल सेनच्या खिशातून पोलिसांनी सुसाईड नोट सापडली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami