संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

महिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोची – मल्याळम अभिनेता विजय बाबू याला एका महिलेच्या लैगिंक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. एर्नाकुलम दक्षिण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले असता पोलिसांनी विजय बाबू याला ताब्यात घेतले.

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका अभिनेत्रीने विजय बाबूविरोधात दिली आहे. पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करतील, असे बोलले जात आहे. न्यायालयाने त्याला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्यांना कोणत्याही सोशल किंवा इतर माध्यमांसोबत संवाद साधू नये, असे निर्देश देण्यात आले होते.

विजय बाबू याच्याविरुद्ध लैंगिक छळाचा आणि दुसरा गुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारदाराची ओळख उघड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोची येथील फ्लॅटमध्ये विजय बाबूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारकर्त्या महिलेने केला आहे. विजय बाबूने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. विजय बाबूने चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने घाणेरडे काम केल्याचेही पीडितेने सांगितले. मात्र, विजय बाबूने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या महिलेविरुद्ध मानहानीचा दावा करणार असल्याचेही विजय बाबूने सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami