*प्रवाशांचे हाल
मुंबई
कोल्हापूरहून मुंबईकडे मंगळवारी रात्री 8.50 वाजता सुटलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस तब्बल साडेसात तास उशिराने म्हणजेच बुधवारी दुपारी 2.30 वाजता मुंबईतील सीएसएमटीवर पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापासही सामोरे जावे लागले.
मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाल्यानंतर ही एक्स्प्रेस सातारा ते कोरेगावदरम्यान मध्यरात्री पोहोचली. तेथे दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने एक्स्प्रेसेला क्रॉसिंगसाठी हिरवा सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे पुढे ही याच कारणामुळे या एक्स्प्रेसतून प्रवास करणाऱ्यांना सकाळी 9 वाजता पुणे स्टेशनला पोहोचता आले. पुण्यातही उशीर झालेल्या या एक्स्प्रेसला सिग्नल लवकर मिळाला नाही. त्यामुळे सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईला पोहोचणारी ही महालक्ष्मी एक्स्प्रेस दुपारी 2 वाजता ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली आणि तेथून पुढे मुंबईला पोहोचण्यासाठी आणखी 40 मिनिटे म्हणजेच 2.40 ही एक्स्प्रेस सीएसएमटीवर पोहोचली.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले की, सातारा ते कोरेगाव यादरम्यानची दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर या मार्गावर होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेसला सिग्नल मिळण्यास वेळ लागला. आजपासून ही रेल्वे सुरळीत सुरू राहील व प्रवाशांना त्रास होणार नाही.