संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

”महाराष्ट्र योद्धा” म्हणत ठाण्यात झळकले उद्धव ठाकरेंचे बॅनर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे – ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या ठाणे महापालिकेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. मात्र आता त्याच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे बॅनर लागले आहेत.’महाराष्ट्र योद्धा”असा या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र योद्धा असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘ न झुकणारा न वाकणारा दिल्लीश्वरांच्या अन्यायी महाशक्तिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी वृत्तीने आव्हान देणारा बाळासाहेबांच्या संघर्षमय विचारांचा खरा वारसदार उद्धव ठाकरे’ असा या बॅनरवर मजकूर छापण्यात आला आहे. या बॅनरवरून ठाण्यात एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचे समर्थन वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami