परभणी – महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असताना आज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आज महाराष्ट्रात 10 डिसेबरपासून पुढील तीन दिवस रिमझिम पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. रोज दररोज भाग बदलत पाऊस पडणार असून उर्वरीत भागात कोरडे आणि थंडी वातावरण राहिल. हे वातावरण तुर आणि ज्वारी, वेलवर्गीय पिकांसाठी पोषख राहणार आहे.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुबार, बुलढाणा, अकोला, नादेड, परभणी, लातुर, उस्मानाबाद, बीड, जालन्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र रिमझिम पाऊस कोसळणार आहे. अशा परिस्थितीमुळे 10 ते 13 डिसेबरदरम्यान मंगसुळी, देवगड, मनेराजूरी, जत, तासगाव, सावळज, कासेगाव, जत कडवंची निफाड, सटाणा या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, देशात कर्नाटक, तेलगंणा आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली.