संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आता 1 नोव्हेेंबरला सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. काल यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. निवडणुक आयोगाची कारवाई स्थगिती याचिका शिवसेनेने केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली. धनुष्यबाण कुणाचा? ठाकरेंचा की शिंदेंचा ? पुढची लढाई कोण जिंकणार? या सगळ्याचा फैसला आता निवडणुक आयोगच करणार आहे. मात्र, 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवरील सुनावणी आता दिवाळी नंतर म्हणजेच 1 नोव्हेेंबरला होणार आहे.
सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान, राज्यपालांचा निर्णय, शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप या चार याचिकांवर सुनावणी प्रलंबित आहे. मात्र या सुनावण्या आता महिन्याभरासाठी लांबल्या आहेत. पुढील ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सुप्रीम कोर्टाचे कामकाज आता एक महिना पुढे गेले आहे. एक महिना सुनावणी लांबणीवर पडल्याने शिवसेनेच्या चिंतेत काही प्रमाणात भर पडली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज दुपारी सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे.
परिणामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami