संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

महाराणीच्या निधनानंतर भारतापाठोपाठ आफ्रिकेतूनही त्यांच्या हिऱ्याची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जोहान्सबर्ग : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असलेल्या खजिन्याची चर्चा सुरु झाली आहे. ज्या देशांकडून किंवा खंडाकडून हा खजिना नेण्यात आला किंवा लुटण्यात आला तो परत करण्याची मागणी जोर धरत आहे. ब्रिटनच्या ताब्यात असलेला भारतीय ‘कोहिनूर’ हिरा भारताला परत करावा, या भारतीयांच्या मागणीपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील जनतेलाही त्यांचा कोहिनूर परत हवा आहे. ब्रिटनकडे असलेल्या मूळ दक्षिण आफ्रिकेतील या हिर्‍याचे नाव ‘ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटिश साम्राज्याकडे असलेले इतर देशांमधून नेण्यात आलेले हिरे परत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्रिटनने केलेल्या हानीची भरपाई करावी, दक्षिण आफ्रिकेतून चोरून नेलेले सोने, हिरे परत करावेत, अशा आशयाचे ट्वीट दक्षिण आफ्रिकेच्या संसदेचे सदस्य वुयोल्वेथू झुन्गुला यांनी केले आहे.ब्रिटनने ‘ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका’ हा हिरा परत करावा, अशी मागणी दक्षिण आफ्रिकेकडून करण्यात आली आहे. ‘कुलीनन’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा हिरा १९०५ साली दक्षिण आफ्रिकेत उत्खननात सापडलेल्या एका रत्नातून कापण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवादी राज्यकर्त्यांनी हा हिरा ब्रिटिश राजघराण्याकडे सुपुर्त केला होता. दक्षिण आफ्रिकेचा ग्रेट स्टार हिरा महाराणीच्या शाही राजदंडावर बसवण्यात आला होता. हा हिरा 500 कॅरेटचा आहे. तो परत मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत ऑनलाईन याचिकेवर या क्षणापर्यंत 6 हजारांवर नागरिकांनी सह्या केल्या आहेत.

दरम्यान, ब्रिटिशांकडे असलेल्या भारताचा ‘कोहिनूर’ हिरा मायदेशी परतावा यासाठी अनेक दशकांपासून मागणी केली जात आहे. १०५.६ कॅरेटचा ‘कोहिनूर’ हा एक प्राचीन हिरा आहे. १४ व्या शतकात हा हिरा भारतात सापडला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami