संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

महागावमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

यवतमाळ – जिल्ह्यातील आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि दिग्रस तालुक्यातील महागाव येथे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल रात्री दरम्यान घडली आहे.गोकुळ टेटर आणि सोपान गावंडे अशी बुडालेल्या मुलांची नाव आहेत. काल शुक्रवारी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोघे जण आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते.गणपती विसर्जन ही करण्यात आले आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी देखील परतले.मात्र, गोकुळ आणि सोपान गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी परत नाल्यावर गेले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेजण नाल्यात बुडाले. दोघांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेने असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami