संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

महागाईला रोखण्यासाठी अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भारतासह जगाला पोहचणार मोठी झळ

वॉशिंग्टन- देशातील वाढत्या महागाईला रोखण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केलेली आहे.व्याजदरात ०.७५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरॉम पॉवेल यांनी जाहीर केला आहे.त्याचा दूरगामी परिणाम भारतासह संपूर्ण जगाला त्याची झळ पोहचणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फेडलर रिझर्व्हने यापूर्वी व्याजदर ७५ बेसिक पॉईंटने वाढवले होते.अमेरिकेतील महागाई २ टक्केपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट फेडरल रिझर्व्हने ठेवले आहे. पण अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात महागाईचा निर्देशांक ८.३ टक्के इतका होता.अमेरिकेतील व्याजदरांचा परिणाम जगभरातील गुंतवणुकीवर होतो, त्यामुळे अनेक देशांचे याकडे लक्ष लागून राहिलेले होते. तर जागतिक बँकेने जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत असल्याने त्याचा परिणाम जागतिक जीडीपवर होऊन जगभरात मंदी येऊ शकते, असा इशारा यापूर्वीच दिलेला आहे.फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याचे पडसाद यापूर्वी जगभरातील शेअर बाजारात उमटले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेची २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान मॉनेटरी पॉलिसीशी संबधीत बैठक पार पडणार आहे. अमेरिकेने वाढवलेल्या व्याजदरामुळे भारतीय रिझर्व्ह बँक देखिल आपल्या व्याज दरात वाढ करण्याची शक्यात निर्माण झाली आहे. आता सलग तिसर्‍या वाढीनंतर फेडरल बँकेचा बेंचमार्क फंड रेट ३ टक्क्यावरून ३.२५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २०२३ पर्यंत व्याजदर ४.६ टक्क्यांपर्यंत जाण्याचा व्यक्त केला जात आहे.काल डाऊ जोन्स ५२२ अंकानी घसरून ३०१८४ च्या पातळीवर बंद झाला होता.
दरम्यान, स्विस बॅंकेने उणे ०.२५ टक्का व्याजदरात वाढ करून ते ०.५ टक्का केले आहे.स्विसमध्ये मागील अनेक वर्षापासुन उणे व्याजदर आहे.तर ऑगस्टमध्ये स्विसमध्ये महागाईदर ३.५ टक्के होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami