संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

महाकालेश्वरला भक्तांकडून यंदा ८१ कोटींचे विक्रमी दान मिळाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उज्जैन -महाकालेश्वर मंदिराला यंदा विक्रमी दान मिळाले आहे. भाविकांनी वर्षभरात ८१ कोटींचे दान दिले आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. आजवर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दान मिळाले. दानपेटीत जमा झालेले दान, देणग्या, लाडवाचा प्रसाद आणि धर्मशाळांना मिळालेले पैसे यांचा त्याच समावेश आहे. महाकालेश्वरला आतापर्यंत सर्वात जास्त दानातून हे उत्पन्न मिळाले, असे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये विख्यात महाकालेश्वर मंदिर आहे. देश-विदेशातून रोज हजारो भाविक तेथे दर्शनासाठी येतात. त्यात बडे व्यापारी आणि उद्योगपतींचाही समावेश असतो. हे भाविक महाकालेश्वरला सढळ हाताने देणग्या देतात. काहीजण दानपेटीत पैसे आणि सोने टाकतात. काहीजण देणग्या म्हणून धनादेश देतात. काही भाविक ऑनलाईन देणग्या देतात. पूजा आणि अभिषेक यासाठी देणग्या दिल्या जातात. बाबा महाकालसाठी लाडूचा प्रसाद आणि धर्म शाळेत राहणाऱ्या भाविकांकडून भाड्याचे पैसे मिळतात. असे यंदा एकंदर ८१ कोटी महाकाल मंदिराला मिळाले आहेत. १ सप्टेंबर २०२१ ते १ सप्टेंबर २०२२ या काळात मंदिराला हे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. त्यात १ सप्टेंबर २१ ते १५ सप्टेंबर २०२२ या काळात ५३ कोटी ३० लाख ४३ हजार ४५१ एवढे पैसे दानपेटीत मिळाले. लाडू प्रसादाचे २७ कोटी २५ लाख २ हजार ७० रुपये आणि धर्म शाळेतून ४५ लाख २५ हजार ४३५ रुपये मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते दुप्पट आहे, असे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami