अलुवा: केरळमधील लोकप्रिय चित्रपट निर्माता जोसेफ मनु जेस्म यांचे निधन झाले आहे. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्यूमोनिया झाला होता. केरळमधील अलुवा येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जोसेफ यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.
जोसेफचा पहिला चित्रपट ‘नैन्सी रानी’ लवकरच प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात अर्जुन अशोका आणि अहना कृष्ण हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी चित्रपटाचा निर्माता जोसेफचे निधन झाले आहे.जोसेफ हे केवळ चित्रपट निर्माते नव्हते. त्यांनी २००४ साली कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक अभिनेता म्हणून ‘आय अॅम क्युरियस’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. जोसेफ याच्या पश्चात पत्नी मनू नैना आहे. आता निर्माता म्हणून तो एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात करत होते. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे.