संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

मलिकांची सुधारित याचिकाही फेटाळली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांनी सुधारित याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने मलिकांची मागणी फेटाळली आहे. दरम्यान, राज्यसभेच्या 6 जागांसाठी विधानभवनात मतदान सुरू झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी 2 वाजेपर्यंत 281 आमदारांनी मतदान केले असून आता 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मतदानाची परवानगी देण्याची मागणी तुरुंगात असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाने याला नकार दिल्यानंतर देशमुख आणि मलिकांनी वरील न्यायालयात धाव घेतली. मात्र विशेष न्यायालयानेही त्यांना दणका दिला. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मतं कमी होणार हे स्पष्ट होतं. यानंतर दोन्ही मंत्र्यांच्या वकिलांनी पुन्हा याचिका दाखल केली. ईडीकडून अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. तर, अनिल देसाई यांनी मलिक यांची बाजू मांडली. त्यांनी तात्पुरत्या जामिनाची मागणी केली. मात्र अटक असताना जामीन कोणत्या आधारावर द्यायचा, असा सवाल न्यायालयाने केला . त्यावर प्रत्युत्तर देताना पोलीस बंदोबस्तात मतदान करू देण्याची मागणी करण्यात आली. मात्र आता मलिकांना सुधारित याचिकेबाबतही फटका बसला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami