संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

मराठा आरक्षण आणि कर्जामुळे बीडमध्ये शेतकर्‍याची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बीड – ‘माझ्या मुलाबाळांना शिक्षणासाठी खर्च मी करू शकत नाही आणि त्यांना शिक्षण दिले तरी मराठा समाजाला आरक्षण नसल्याने शिक्षणाचा फायदा होत नाही.मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणामुळे मी माझे जीवन संपवत आहे’, अशी चिठ्ठी लिहून बीडमध्ये एकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंमरी येथे ही घटना घडली.दादा जगन्नाथ डिसले, असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते शेतकरी असल्याचे समजते.मराठा आरक्षण नसल्याने दादा डिसले यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्विटरवर महेश पाटील यांनी डिसले यांना श्रद्धांजली देत म्हटले आहे की,समाज बांधवांचे बलिदान देऊन आम्हाला आरक्षण नकोय मराठा बांधवांना एवढेच म्हणायच की घरात रडून मरण्यापेक्षा रस्त्यांवर उतरून लढून मरू.सुशील पाटील या युझरने म्हटले आहे की, मराठा आरक्षणामुळे एका बांधवाने जीवनयात्रा संपवली.त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकारने लवकर निर्णय घ्वावा. अन्यथा निराशेने आमचे बांधव स्वत:ची जीवनयात्रा संपवतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami