डबलिन – लिओ वराडकर पुन्हा एकदा आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले आहेत.लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे आहेत.२०२० मध्ये स्थापन झालेल्या आघाडी सरकारमध्ये सत्तावाटप करारानुसार ते पंतप्रधान झाले आहेत. यापूर्वी २०१७ ते २०२० पर्यंत ताओसेच हे पंतप्रधान आणि वराडकर हे संरक्षण मंत्रीही राहिले आहेत.
लिओ वराडकर मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचे असून ते भारतभेटीवर येत असतात.याआधी ते २०१९ मध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी महाराष्ट्रात आले होते.लिओ वराडकर यांचा जन्म डब्लिन येथे झाला.त्यांची आयरिश आई नर्स होती तर त्यांचे भारतीय वंशाचे वडील अशोक वराडकर हे डॉक्टर होते. त्याचे आई-वडील एकत्र काम करायचे.लिओ हे देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत.लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान बनणारे सर्वात तरुण नेते आहेत, त्यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.वराडकर सध्या ४३ वर्षांचे असून ते समलिंगी आहेत.लिओ वराडकर २९ डिसेंबर २०१९ रोजी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ गावी आले होते.येथे त्यांनी ग्रामदैवताची पूजाही केली.वराडकर यांचा हा खाजगी दौरा होता.लिओ वराडकर आत्तापर्यंत चार वेळा भारतात आले असून त्यांना मराठी बोलता येते.वडिलांनी त्यांना मराठी बोलायला शिकवले आहे.