संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

ममता बॅनर्जी कुलपती होणार! विधानसभेत विधेयक मंजूर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता- पश्चिम बंगाल विधानसभेने राज्यपाल जगदीप धनखर यांच्या जागी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विद्यापीठांच्या कुलपती म्हणून नियुक्त करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी 31 सरकारी विद्यापीठांच्या कुलपती म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसाठी विधेयक सादर केले, दरम्यान विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षा न जुमानता हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

या विधेयकाच्या बाजूने 182 तर विरोधात 40 मते पडली. त्यानंतर विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. यादरम्यान विधानसभेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जोरदार वादावादी झाली. तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि इतर सहा भाजप नेत्यांंना शिस्तभंगाच्या कारणास्तव विधानसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आले होते, त्यांनी विधेयक आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाई विरोधात सभागृहाबाहेर आंदोलन केले. तृणमूल काँग्रेस आपल्या ताकदीमुळे विधेयक मंजूर करण्यात यशस्वी झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami